वाढत्या करोनामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊन
X
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा,औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात रविवारपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रविवारपासून जिल्हा बंद राहणार असून जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणं ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली असून शहरात राजापेठ, साईनगर, बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणी नगर यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने कारवाई करणं सुरू केलं आहे. या भागात प्रशासन घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.
15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. पण, खबरदारी म्हणून अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये उघडण्याची तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील महाविद्यालये 2 आठवडे उशिराने उघडणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
तर दुसरीकडे करोनाचा धोका लक्षात घेता औरंगाबाद मध्ये १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद राहणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली.