दारु न मिळाल्याने सॅनीटायजर प्यायले , 7 लोकांचा मृत्यू ...
X
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमानुसार राज्याती सर्व दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे. दारू न मिळाल्याने नागरिकांनी दारू ऐवजी सॅनीटायजरचे सेवन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यात सॅनिटायजर पिलेल्या ७ लोकांचा जीव केला असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. राज्य सरकारकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना यवतमाळमधील वणी या शहरात घडलेली आहे. वणी शहरातील काही नागरिकांनी दारू न भेटल्यामुळे सॅनीटायझरचे व्यसन केले. काही वेळाने त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
उपचारादरम्यानच ७ लोकांचा मृत्य झाला असून हे लोक गवंडी कामगार असल्याचं समोर आलंय. यवतमाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ लोकांचा मृत्यू झाला असून सर्व मृत व्यक्ती हे गवंडी कामगार होते. दारू न मिळाल्याने या कामगारांनी सॅनीटायझरचे सेवन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.