धनगर समाजाच्या मुलांनाही वस्तीगृहात सामावून घेऊ - वडेट्टीवार
X
औरंगाबाद : राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना ही वस्तीगृहात सामावून घेऊ असं राज्याचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
राज्यात नवीन 72 वस्तीगृह सुरू करणार आहोत यासंदर्भाचे प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आले आहे मात्र अगोदर पाठवलेल्या सहा बांधकाम प्रस्तावाला अजून परवानगी मिळाली नाही, त्यामुळे सध्या भाडेतत्त्वावर ती इमारती घेऊन त्यामध्ये वस्तीगृह सुरू करण्यात येतील,असं मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सोबतच पहिली ते बारावी पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ही धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला न्याय मिळावा या हेतूने सर्व समाजाचा विचार करून घेण्यात येईल असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.