इंग्लंडमधील स्टेडियमला लिटिल मास्टर सुनील गावसकर याचं नाव
X
इंग्लंडमधील लेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात येणार आहे. 23 जुलै शनिवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. लेस्टर महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांना सन्मानित करेल. महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर हे सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहेत. कसोटी फॉर्मेटमध्ये ते महान आहेत, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आणि बनवले.
इंग्लंडच्या मैदानाला गावसकर यांचं नाव मिळाल्यामुळे त्यांच्याच नव्हे तर भारताच्या देखील शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेटचे स्टेडियमला नाव असणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरणार आहेत. इंग्लंडमधील लीसेस्टर क्रिकेट ग्राउंडला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमधील अभूतपूर्व योगदानाबद्दल लेस्टर क्रिकेट भारताच्या माजी कर्णधाराचा गौरव करणार आहे.
सुनील गावसकर हे त्यांच्या काळात लाल चेंडूत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारे ते पहिले फलंदाज होते. ते स्टेडियमवरील आपल्या नावाचे अनावरण करण्यासाठी लेस्टरशायरला जाणार आहेत. स्टेडियम पॅव्हेलियनच्या भिंतीवर सुनीलचे मोठे चित्र रेखाटण्यात आले आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर म्हणतात, "मला आनंद होतोय की लेस्टरमधील स्टेडियमला माझं नाव दिलं जाणार आहे. लेस्टर शहर हे खेळाचे, विशेषतः भारतीय क्रिकेटचे सर्वात मजबूत समर्थक आहे. त्यामुळे हा खरोखरच मोठा सन्मान आहे."
माध्यमांच्या वृत्तानुसार, या सन्मानासाठी पुढाकार भारतीय वंशाचे यूकेचे कीथ वाझ यांनी घेतला होता. ते 3 दशकांपासून लेस्टरच्या विधानसभेत कार्यरत आहेत. वाझ म्हणतात, "आम्हाला गौरव वाटतो की गावस्कर यांनी या खेळपट्टीला आणि मैदानाला त्यांचे नाव देण्यास सहमती दर्शवली आहे."