Home > News Update > मजकूर चोरीबाबत Rapid Risk कंपनीला कायदेशीर नोटीस

मजकूर चोरीबाबत Rapid Risk कंपनीला कायदेशीर नोटीस

मजकूर चोरीबाबत Rapid Risk कंपनीला कायदेशीर नोटीस
X

डेटा चोरणे, कंटेंट ची चोरी (मजकूर चोरी) व माहितीपत्रकावरील वापरलेल्या छायाचित्रांची चोरी, अशा वेगळ्याच प्रकारच्या चोरीबाबत नाशिक येथील Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. च्या संचालकाना Medico Legal Key Solutions Pvt Ltd. कंपनीने Adv.असीम सरोदे , Adv.अजित देशपांडे, Adv.अक्षय देसाई यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठली आहे.

Medico Legal Key Solutions Pvt Ltd. कंपनीचे सल्लागार adv जगदीश देवरे या बाबत माहिती देताना म्हणाले की, आमच्या कामाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकावरील परिच्छेद जसेच्या तसे असून तशीच शब्दरचना शब्द्नियोजन आणि परीछेदांची मांडणी करून Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. ने त्यांची माहितीपत्रके प्रसिध्द केली. इतकेच नाही तर जी छायाचित्रे इंटरनेट साईट वरून पैसे देऊन विकत घेतलेली आहेत ती सुद्धा त्यांनी त्यांच्या माहितीपत्रकात वापरली.

अशा प्रकारची चोरी हा नवीन प्रकार आहे. त्यामुळेच आमच्यासारखेच कार्य करीत असल्याचा भास निर्माण करून बेकायदेशीर कमाई करण्याच्या उद्देशाने केलेल्या या चोरीबाबत आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कोणाचा तरी छापील मजकूर चोरणे, तो जसाच्या तसा स्वतःच्या उपयोगासाठी वापरणे या चोरीप्रकाराबद्द्ल २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. तसेच Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. या कंपनीने जाहीर माफीनामा द्यावा, या चोरीच्या आधारे तयार केलेल्या माहितीपत्रकांच्या आधारे नाशिक मधील कोणकोणते डॉक्टर, हॉस्पिटल आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. यांनी त्यांचे ग्राहक बनवले याचीही माहिती नोटीस मधून मागितल्याचे Adv.असीम सरोदे म्हणाले.

विशेष म्हणजे नाशिक येथील सरकारी दवाखान्यातील शवविच्छेदन विभागात कार्यरत डॉक्टर आनंद पवार हे सरकारी नोकरीत असून Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. या खाजगी कंपनीसाठी काम कसे करू शकतात? असा सवाल कायदेशीर नोटीस मधून उपस्थित करण्यात आला आहे.

डॉक्टर आनंद पवार हे मेडीकल कौन्सिल ऑफ इंडिया च्या नैतिकता नियंत्रण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. असे देखील नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिकमधील प्रसिध्द सरकारी वकील Adv. Ajay मिसार व दुसरे प्रसिध्द वकील Adv.मनीष बस्ते हे Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. शी संबंधित आहेत असा सुद्धा बनाव Rapid Risk Management Consultant Pvt Ltd. चे संचालक करीत असल्याचा आरोप नोटीस मधून करण्यात आला आहे.

Updated : 13 Sept 2021 8:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top