Home > News Update > 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट'- प्रविण दरेकर

'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट'- प्रविण दरेकर

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट- प्रविण दरेकर
X

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपला भाजपचे नेते तथा राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट' अशा शब्दात दरेकरांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

याच मुद्यावरून आता पुन्हा एकदा भाजप- राष्ट्रवादीत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Updated : 2 Sept 2021 11:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top