Home > News Update > केरळमध्ये पुन्हा डाव्यांची सत्ता, कोरोना काळातील चांगल्या कामांना कौल

केरळमध्ये पुन्हा डाव्यांची सत्ता, कोरोना काळातील चांगल्या कामांना कौल

केरळमध्ये पुन्हा डाव्यांची सत्ता, कोरोना काळातील चांगल्या कामांना कौल
X

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधील चित्र आता जवळपास स्पष्ट झाले. पश्चिम बंगाल, केरळ आणि आसाममध्ये जनतेने पुन्हा सत्ताधाऱ्यांनी संधी दिली आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्या आघाडीचे पिनराई विजयन मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. देशातील पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळळ्यानंतर विजयन यांच्या सरकारने तातडीने पावलं उचलत केरळमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली होती. दुसऱ्या लाटेतही केरळ सरकारने योग्य प्रकारे नियोजन रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश आले आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशा पडताना दिसते आहे. 140 जागांच्या विधानसभेत सध्या एलडीएफ 89 जागांवर आघाड़ीवर आहे. तर काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या वेळीपेक्षा काँग्रेस यंदा 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Updated : 2 May 2021 1:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top