चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन
X
अमेरिका, रशिया, चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. सर्व भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यासाठी गोल देऊळ येथे मंत्रोपचार व हवन याचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातून भारताचे अभिनंदन तसेच शुभेच्छा देण्यात येत आहेत. हि चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरणार आहे.
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे जेणेकरुन सुरक्षित लँडिंग आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची क्षमता प्रदर्शित केली गेली आहे. यात लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. हे LVM3 द्वारे SDSC SHAR, श्रीहरिकोटा येथून लॉंच केले केले गेल आहे. प्रोपल्शन मॉड्यूल 100 किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाणार आहे. प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मेट्रिक मोजमापांचा अभ्यास केला जाणार आहे.
‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.