Home > News Update > कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
X

कसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामकसारा घाटात दरड कोसळली, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणामशहापूर – तालुक्यात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे वाहततुकीवर परिणाम झाला आहे. कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ इगतपुरीकडे जाणाऱ्या डाऊनमार्गावर दरड आणि झाड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता ही दुर्घटना घडली.

रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ, आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सर्व प्रकारच्या गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. इगतपुरीकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक काही प्रमाणात बदलण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पासवसामुळे मुंबईतील काही स्थानकांमध्येही पाणी भरले होते. त्यामुळे मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यानुसार काही गाड्या वेगळ्या मार्गांनी सोडण्यात येत आहेत, तर काही गाड्यांची सुटण्याची वेळ बदलण्यात आली आहे. तिकडे कोकण रेल्वे मार्गावरही ट्रॅकवर माती वाहून आल्याने Amritsar-Kochuveli विशेष ट्रेनाचा मार्ग पनवेल मार्गे पुणे-मिरज आणि पुढे असा बदलण्यात आला आहे.

Updated : 19 July 2021 10:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top