Home > News Update > लखीमपूर खेरी: शेतकऱ्यांचं आज 'रेल रोको' आंदोलन, मंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची मागणी...

लखीमपूर खेरी: शेतकऱ्यांचं आज 'रेल रोको' आंदोलन, मंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची मागणी...

लखीमपूर खेरी: शेतकऱ्यांचं आज रेल रोको आंदोलन, मंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची मागणी...
X

Photo courtesy : social media

लखीमपूर खेरी घटनेने आजही शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आज सोमवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2021 ला 'रेल रोको' आंदोलन जाहीर केले आहे. दरम्यान, हे आंदोलन आज सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चालणार आहे. शेतकरी संघटनांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, हे आंदोलन देशव्यापी असेल आणि रेल्वे ट्रॅक पूर्णपणे शांततेच्या मार्गाने केले जाईल.

शेतकरी संघटनांच्या वतीने रविवार, 17 ऑक्टोबर 2021 रोजी संयुक्तपणे जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, "लखीमपूर खेरी हिंसाचारात न्याय मिळावा म्हणून अजय मिश्राला बरखास्त करण्याच्या तसेच अटकेच्या मागणीसंदर्भात 18 ऑक्टोबर रोजी सोमवारी देशभरात 'रेल रोको' आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्राच्या तीन नवीन शेती कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनांनी, लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या संदर्भात बोलताना संयुक्त किसान मोर्चाने 'रेल रोको' आंदोलनादरम्यान, सर्व रेल्वे वाहतूक बंद केली जाईल. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सहा तासांसाठी होईल असं सांगितलं आहे.

दरम्यान, लखीमपूर खेरी घटनेत न्यायाची मागणी करणाऱ्या गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची आणि अटक करण्याची मागणी पुन्हा केली जात आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चाने सर्व लोकांना रेल्वे रोको मोहिमेदरम्यान शांततेने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या मालमत्तेचे नुकसान न होता आंदोलन यशस्वी केले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे

काय आहे प्रकरण?

रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.

Updated : 18 Oct 2021 11:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top