पंपही गेला,पैसाही गेला ...तरी हाती नाही लागली योजना ...
शेतकऱ्यांना कमी पैश्यात सोलर पंप मिळावा यासाठी शासनाने कुसुम सोलर पंप योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या येत आहेत.
X
केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुसुम सॊलर पंप योजना राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कमी पैश्यात सॊलर पंप मिळणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रथम ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फॉर्म भरताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
कुसुम सोलर पंप योजनेत ऑनलाईन फॉम भरताना नेमक्या कोणत्या समस्या येत आहेत ?
मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकरी उमेश सुनील पटाईत यांनी या संदर्भांत माहिती दिली आहे. उमेश यांनी कुसुम योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे भरून देखील अर्जप्रक्रिया पूर्ण झाली नाही ,असे त्यांनी सांगितले आहे. अर्ज भरण्यासाठी पहिले आपले नाव रजिस्टर करावे लागते . त्यासाठी 100 रुपये घेतले जातात. संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी 4 मिनिटांचीच वेळ दिली असून 4 मिनिटात फॉर्म नाही भरता आला तर पुन्हा 100 रुपये भरून फॉर्म भरावा लागतो. अश्या प्रकारे आपण फक्त चार वेळाच फॉर्म भरू शकतो. वेबसाईट खूप सावकाश चालत असल्यामुळे चार मिनिटात फॉर्म भरणे शक्य नाही. आत्ता पर्यंत उमेशचे ३०० रुपये जाऊन देखील फॉर्म सबमिट झाला नाही असे देखील उमेशने सांगितले आहे .