झाले हे बरे झाले; अजित पवारांच्या बंडावरती कुमार केतकर यांची प्रतिक्रिया
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी 'हे' उत्तर दिले
X
मुंबई - २ जूनला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. यावर आता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी 'हे' उत्तर दिले
कुमार केतकर म्हणाले आहेत की 'राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यासाठी शिवकालिन इतिहासाचे संदर्भ असले तरी ते देण्याचीही गरज नाही. त्यांची नाळ नरेंद्र मोदींच्या फॅसिस्ट राजकारणाशी जुळते हे २०१४ पासूनच दिसले आहे. एका अर्थाने झाले हे बरे झाले. आता काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकते वा शक्य झाल्यास उद्धव ठाकरेंबरोबर समझोता करू शकेल. असेही म्हणता येईल की शरद पवारही त्यांच्या पक्षाचा श्रृंखालांमधून मुक्त झाले आहेत. समर्थकांना आता 'तळ्यात-मळ्यात' राहण्याचे सोईचे राजकारण करता येणार नाही. इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये त्यांच्या पक्षातल्या पंचमस्तंभीयांना असेच आव्हान देऊन नामोहरम केले होते. इडी(ED) - सीबीआयरन (CBI) घाबरून जे भेकड शरद पवारांना सोडून गेले आहेत. त्यांची गत पूर्वीच्या
सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय होणार हे स्पष्ट आहे. या मंडळींच्या जाण्याने मविआ संपली पण फॅसिझमविरोधी शक्ती मात्र, बळकट होऊ शकतील. कपट-कारस्थानांचे मोदी-शहांचे राजकारण भले त्यांच्या भक्तांना 'मास्टरस्ट्रोक' वाटत असेल, पण या मास्टरस्ट्रोकर्सचा त्रिफळा कसा उडतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता काँग्रेसने पूर्ण आमविश्वासाने आणि स्वबळाने, राहुल गांधीप्रमाणे लेकांमध्ये जाऊन पक्ष समर्थ करायल हवा – आता हवा अधिक स्वच्छ झाली आहे'