कोरेगाव-भीमा प्रकरण, गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी
Max Maharashtra | 16 Nov 2019 9:21 AM IST
X
X
कोरेगाव-भीमा ( bhima coregaon) प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना ११ नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. अटकेपासून संरक्षण देण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्यानंतर नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी बुधवारी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या जामीन अर्जावर गुरवारी न्यायमुर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
‘नवलखा’ यांच्या संर्दभातले सगळे पुरावे ते संघटनेचे सक्रिय सदस्य व नेते असल्याचे आहेत. पोलीस त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, न्यायालयाच्या वेगवेगळ्या आदेशामुळे आजपर्यंत त्यांना अटक होऊ शकली नाही.
हे ही वाचा...
सरकार गेलं चुलीत, सरकार नाही आलं तरी चालेल आधी रूग्णवाहिका येऊ द्या…
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस, 3 मिनिटात सुनावल्या 10 खटल्यात नोटीसा
महाशिवआघाडीचा विलंब भाजपच्या पथ्यावर?
त्यांची पोलीस कोठीडीत चौकशी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे', असे पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मंगळवारी आपल्या आदेशात स्पष्ट केलं. गुरुवारी न्या. नाईक यांच्यासमोर याविषयी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळल्यास पुणे पोलिसांकडून त्यांच्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकारणावर काय निर्णय घेते याकडे सर्वांच लक्ष लागले.
Updated : 16 Nov 2019 9:21 AM IST
Tags: ajit pawar amit shah bjp congress Devendra Fadanavis devendra fadanvis maharashtra Maharashtra Election Maharashtra Election 2019 marathi news max maharashtra maxmaharashtra news sharad pawar Shivsena राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकरी
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire