कोकणात मुसळधार , Red Alert इशारा
चोवीस तासांत रत्नागिरीत २६० मिलिमीटर पाऊस नोंद झाली आहे. जिल्ह्य़ांमध्ये २२ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज.
X
कोकणात ७२० किमीची किनारपट्टी असल्यामुळे ह्या पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. समुद्र किनारपट्टी कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे . गेल्या चोवीस तासांत रत्नागिरीत २६० मिलिमीटर पाऊस नोंद झाली आहे. महाराष्ट्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात मुबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत आणि पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्य़ांच्या घाट विभागांमध्ये अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरून मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे येत असल्याने कोकण विभागात सर्वत्र पाऊसाने जोर धरला आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याची माहीती मिळत आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह सर्वच जिल्ह्य़ांमध्ये २२ जुलैपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहेत. 'रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील काही भागांमध्ये १९ जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.
पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांतील घाटविभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.