Home > News Update > कोकणातील पूरग्रस्तांना 'आम्ही बुलढाणेकर' गटाचा मदतीचा हात

कोकणातील पूरग्रस्तांना 'आम्ही बुलढाणेकर' गटाचा मदतीचा हात

Konkan flood Aamhi Buldhana Kar Group help to konkan flood affected people

कोकणातील पूरग्रस्तांना आम्ही बुलढाणेकर गटाचा मदतीचा हात
X


महापुराने बाधित झालेल्या नागरिकांना कोकणमध्ये प्रत्यक्ष गावात जाऊन पुरग्रस्तांच्या हातात मदतीची कीट देण्यासाठी 'आम्ही बुलढाणेकर' हा गट आज कोकणात दाखल झाला. 'आम्ही बुलढाणेकर' गटाने जवळपास 300 कुटुंबांना यावेळी मदत केली.

महापुराने बाधित झालेल्या नागरिकांना कोकणामध्ये प्रत्यक्ष गावात जाऊन पुरग्रस्तांच्या हातात मदतीची कीट देण्यासाठी 'आम्ही बुलढाणेकर' आज कोकणात दाखल झाले. 14 ऑगस्टला 'आम्ही बुलढाणेकर' गट कोकणाकडे निघाले होता. या गटाच्या माध्यमातून कोकणवासियांना सांत्वना, दिलासा आणि आधार देण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मागील दहा दिवसांपासून 'आम्ही बुलढाणेकर' ग्रुपच्यावतीने कोकण पुरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला होता. समाजातील सर्वच वर्गाने आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत यथाशक्ती मदत दिली. आम्ही बुलडाणेकरांच्या सादेला सामान्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. मदतपेटीत पैसे नव्हे तर माणूसकी सामावली होती. 300 कुटुंबांना प्रत्येकी चटई, ब्लॅंकेट, 2 प्लेट, 2 टॉवेल, एक तांब्या, कढई, पळी, एक डब्बा अशी मदत कीट तयार करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष गावात जाऊन मदत करण्याच्या हेतूने वाहतुकीचा खर्च मिळून एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मदत निधी अपेक्षित होता.

अपेक्षित निधीची पातळी ओलांडत बुलढाणाकरांनी मदत केली. अपेक्षित मदतीची रक्कम जमा झाल्यामुळे मदतीचा स्वीकार करणे थांबविण्यात आले होते.

आवश्यक निधीतून वाजवी किंमतीत वस्तू देणाऱ्या सहृदयी व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यात आला. संपूर्ण दिवसभर जवळपास 30 ते 40 जणांनी मिळून दहा वस्तूंची एक, याप्रमाणे 301 कीट तयार करण्यात आल्या. एका मोठ्या आयशर ट्रकमध्ये ह्या कीट भरून 'आम्ही बुलढाणेकर' ची एक टीम महाडसाठी रवाना झाली होती.

महाड, पोलादपूर शहर आणि तालुक्यातील जवळपास 101 गावे पूरग्रस्त आहेत. त्यातील 46 गावांमध्ये 100 टक्के नुकसान आहे. 1200 पेक्षा अधिक पशुहानी झाली आहे, तर 3 माणसे दगावलीत. या दोन तालुक्यात 'आम्ही बुलढाणेकर' टीमने मदत कीट दिली.

महाड तालुक्यातील राजेवाडी गावात 33 कीट, शहरातील संत रविदास नगरमध्ये 55 कीट, नंतर पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे 18 कीट, अकले गावात 67 कीट, अकलेवाडी गावात 37 कीट, भोरगांव येथे 50 कीट तर कापडे बु. गावातील आदिवासी पाड्यात 41 कीट वितरीत करण्यात आल्या.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता, त्या सुतारवाडीला "आम्ही बुलडाणेकर" यांनी सांत्वना भेट दिली. येथील दुःखी 18 परिवारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत कीट देण्यात आली.

Updated : 19 Aug 2021 10:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top