कॉ.पानसरे हत्येतील आरोपींना दणका: दोषमुक्ती अर्ज फेटाळला
जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे(Comrade govind pansare) हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरे यांना कोल्हापूर न्यायालयाने दणका दिला आहे.या दोघांनीही खटल्यापासून दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता.मात्र कोल्हापूर जिल्हा(kolhapur court) आणि सत्र न्यायाधीश बी डी शेळके यांनी सोमवारी आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.
X

कॉ. पानसरे प्रकरणात अन्वेषण यंत्रणेने नेमके हल्लेखोर कोण ते निश्चित करावे,असा युक्तीवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गेल्या आठवड्यात केला होता.आरोपी तावडे,अंदुरे यांची निर्दोष मुक्तता करावी,यामागणीसाठी त्यांनी युक्तीवाद केला होता. आज सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी तावडे आणि अंदुरे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली.त्याचप्रमाणे त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली.
आरोपींविरुद्ध पानसरे हत्या आणि केलेल्या नियोजन आरखड्याचा सरकार पक्षाकडे भक्कम पुरावा असल्याचेही सरकारी वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.यानंतर आरोपींच्या अर्जावर दोन्ही बाजूने सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.