Home > News Update > अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा

अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा

अमर हबीब यांचे आवाहन

अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
X

अंबाजोगाई (प्रतिनिधी)--

या वर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहडत म्हणून किसानपुत्र आंदोलनच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.

किसानपुत्र आंदोलनच्या वतीने अंबाजोगाई येथे १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अमर हबीब बोलत होते.

अमर हबीब पुढे म्हणाले की, देशातील ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून असतांनापासुन शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. तेंव्हापासून आजपर्यंत आर्थिक विवंचनेतून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत. आज शेतीवर अवलंबून असलेल्या शेतक-यांचे प्रमाण ९० टक्क्यांवरुन दहा ते पंधरा टक्क्यांवर आले आहे, मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही, हे भीषण वास्तव चित्र आहे.

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मागील नऊ वर्षांपासून किसानपुत्र आंदोलन १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राबवित आहे. अंबाजोगाई येथे हा उपक्रम गेली आठ वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून यावर्षी स्थानिक संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांत किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमर हबीब यांनी केले.

विविध उपक्रम

बैठकीच्या प्रारंभी संयोजक सुदर्शन रापतवार यांनी १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये १९ मार्च रोजी सकाळी सामुहिक उपवास, सहवेदना रॅली, शेतकरी सहवेदना पुरस्कार, आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा साडीचोळी देऊन सन्मान, शेतकरी आत्महत्या कारणे आणि मिमांसा या विषयावरील व्याख्यान आणि सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम यांच्या संपुर्ण नियोजनाची माहिती दिली.

या कार्यक्रमात अंबाजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील बहिणींचा सहभाग जास्तीत जास्त कसा करुन घेता येईल यासाठी ऍड. संतोष पवार यांनी माहिती दिली तर आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणीच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन संबंधीची माहिती शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी दिली.

या बैठकीत अच्चुत बापु गंगणे, वसंतराव मोरे, अनिता कांबळे, अनिरुद्ध चौसाळकर, प्रा. शांती नाथ बनसोडे, मदन परदेशी, महावीर भगरे यांनी उपयुक्त सूचना केल्या.

नगर परिषद परीसरातील पत्रकार कक्ष येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस अमर हबीब, कालिदास आपेट, प्रा. शांतिनाथ बनसोडे, मुजीब काजी, अनिरुद्ध चौसाळकर, अच्चूत गंगणे, मदन परदेशी, संतोष बोबडे महावीर भगरे, व्यंकटेश जोशी, वसंत मोरे, इस्माईल शेख, लखन होके, कल्याणराव भगत, रेखा देशमुख, किरण देशमुख, अनिता कांबळे, प्रतिभा अवचर, दत्तात्रय अंबेकर, ऍड. माणिकराव बावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Updated : 2 March 2025 6:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top