किरीट सोमैया आज रेवदंड्यात, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
किरीट सोमैया हे आज रेवदंडा पोलीस स्थानकात व कोर्लई ग्रामपंचायतीत येऊन आपण केलेल्या तक्रारीची माहिती घेणार आहेत
X
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांच्या नावे साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 कथित बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. मात्र या जागेवर बंगलेच नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी देखील या जागेत बंगले नसल्याच्या बाबीला दुजोरा दिलाय. यावर किरीट सोमैया येथील 19 बंगल्याचा टॅक्स भरला असल्याने हे बंगले चोरीला गेले का? असा सवाल सोमैया यांनी उपस्थित केलाय.
किरीट सोमैया हे आज रेवदंडा पोलीस स्थानकात व कोर्लई ग्रामपंचायतीत येऊन आपण केलेल्या तक्रारीची माहिती घेणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील सोमैया भेट देणार आहेत. त्यामुळे पुण्याच्या घटनेच्या पाश्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेवदंडा पोलीस स्थानक, कोर्लई ग्रामपंचायत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी भाजपने झेंडे लावून वातावरण निर्मिती केलीय.
यावर शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली असून किरीट सोमैया यांनी जर रश्मी ठाकरे यांची नाहक बदनामी केल्यास शिवसेना जशास तसे उत्तर देईल असा इशारा दिलाय, या पाश्वभूमी वर सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.