`हा` महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न: पालकमंत्री सतेज पाटील यांचा आरोप
X
भाजप नेते किरीट सौमय्या यांच्या कोल्हापुर दौऱ्यावरुन आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली असताना आता खुद्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कलम १४४ लागू केल्याचे सांगितले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे कोल्हापुर दौऱ्यावर येणार होते. परंतू त्यांना कराडमधे पोलिसांनी उतरवून घेतले. कोल्हापुर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी पालकमंत्री या नात्याने घेतला निर्णय घेतल्याचे सतेज पाटील म्हणाले.
कायद्याच्या नियमात जे असेल ते त्यांनी करावे.या प्रकरणामुळे जिल्ह्यातील शांतता भंग करू नये हीच अपेक्षा आहे.ज्या विभागात तक्रार दिली तो विभाग चौकशी करेल. तक्रारदाराने फिरत बसू नये.पुढील दोन दिवसाच्या परिस्थिती वरून जमावबंदीचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महा विकास आघाडीला सुरुंग लावण्यासाठी हा प्रयत्न आहे. नारायण राणे जेव्हा मंत्री झाले त्यावेळी कोणताही पक्ष भाजप सोबत येणार नाही याची खात्री त्यांना झाले आहे.महा विकास आघाडी सरकार पाच वर्ष राहणार आहे हे माहिती असून सुद्धा इतका आटापिटा का? असा सवाल मंत्री पाटील यांनी उपस्थित केला. तुमचे (भाजपचे) सरकार होते त्या वेळी तुम्ही गप्प का होता?गुन्हा न सांगणे हा गुन्हा असेल तर गुन्हा लपवणे हा देखील गुन्हा आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.