'त्या' व्हीडीओत सोमय्या काय करत होते?
X
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओमधील सत्य सांगताना बुधवारी उच्च न्यायालयात चांगलाच गोंधळ उडाला आहे. न्यालयाने समजून घ्यावं, असं सांगण्याची वेळ किरीच सोमय्यांवर आली आहे. तरीही न्यायालयाने या संपूर्ण प्रश्नांचा भडिमार केला. हा आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहीनीने प्रसारीत केला होता.
दरम्यान या प्रकरणी या वृत्तवाहीनीसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात किरिट सोमय्यांनी शंभर कोटींचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर या दाव्यावर सुनावणी झाली. या सुनावणीत सोमय्या नेमक काय करत आहेत याचं वर्णन सांगताना चांगलीच अडचण झाली. अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पत्ता मुंबईतील नसून संभाजीनगरचा असल्याचे सांगत स्वतंत्र अर्ज करण्यासाठी सोमय्यांच्या वतीने वेळ मागण्यात आला. त्याची नोंद करून घेत ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
न्यायालयाचे प्रश्न
न्या. मोडक - व्हिडीओमध्ये काय आहे ?
वकील - हा व्हिडीओ एका हॉटेलमधला आहे, सोमय्या संभाषण करत होते
न्या. मोडक - समोरील व्यक्ती कोण आहे
वकील - समोर एक महिला आहे
न्या. मोडक - सोमय्या काय करत होते
वकील - न्यायालयाने थोडं समजून घ्यावं
न्या. मोडक - महिला आणि पुरुष साधारणपणे बोलतातच, त्यात बदनामी सारखं काय ?
वकील - या व्हिडीओसंदर्भात वृत्तवाहीनीवर चर्चा झाली, वारंवार वाहीनीवर दाखवण्यात आला. सोमय्या यांनी अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप झाला. त्यामुळे या प्रकरणात बदनामी करण्यात आली आहे.