Home > News Update > लोकशाही चॅनेल पुन्हा सुरू झालं

लोकशाही चॅनेल पुन्हा सुरू झालं

लोकशाही चॅनेल पुन्हा सुरू झालं
X

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाला. या बातमीनंतर देशभरात एकच गजहब माजला होता. सुमारे चार तास हे चॅनेल बंद पडलं होतं, अखेर ते सुरू झालेलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचे वृत्त १८ जुलै रोजी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीनं प्रसारित केलं होतं. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले होते.

१९ जुलै रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी या चॅनेलचं प्रसारण अचानक बंद झाल्याचं या चॅनेलचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्विट करून सांगितलं. त्यावर नेटिझन्ससह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्यामुळं कदाचित प्रसारण बंद केलं असावं, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात वाचण्यात आल्या. याच ट्विटमध्ये संपादक कमलेश सुतार यांनी काही ओळी लिहिल्या त्या अशा #कोराकागदनिळीशाई, #आम्हीकोणालाभीतनाही, बघत राहा #लोकशाही !

लोकशाही चॅनेलचं प्रसारण बुधवारी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी बंद झालं होतं, ते दुपारी १ वाजता सुरू झाल्याचं चॅनेलचे संपादक कमलेश सुतार यांनीच पुन्हा ट्विट करून सांगितलं. त्यामुळं चर्चांना पूर्णविराम मिळाला.


Updated : 19 July 2023 5:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top