Home > News Update > INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या अडचणीत, आज होणार चौकशी

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या अडचणीत, आज होणार चौकशी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत प्रकरणावरून गंभीर आरोप केल्यानंतर आता ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या अडचणीत, आज होणार चौकशी
X

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत 2013 साली किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी INS विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याप्रकरणी मुंबईतील ट्रॉम्बे येथील पोलिस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना पोलिसांनी समन्स पाठवून 11 वा. चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Kirit Somaiya Breaking News)

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात निवृत्त जवान बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी आज 11 वा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. (Tromby police send notice to kirit somaiya)

काय आहे प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत युध्दनौका वाचवण्यासाठी 2013 ते 2015 या कालावधीत जमा केलेला पैसा निवडणूकीसाठी आणि स्वतःच्या व्यवसायासाठी वापरल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर INS विक्रांत ही फक्त युध्दनौका नसून पाकिस्तानचे तुकडे पाडण्यासाठी महत्वाची ठरलेली भारताची अस्मिता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे यामध्ये किरीट सोमय्या यांनी पैसे लाटले असल्याचा आरोप करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी मागणी केली आहे.(Sanjay Raut Allegation on kirit somaiya)

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचे 2013 ते 2015 या कालावधीतील पैसे जमा करतानाचे फोटो शेअर करत जमा झालेले पैसे राजभवनकडे सुपुर्द का केले नाहीत? ते पैसे कुठे आहेत, असे सवाल केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी दोन दिवसानंतर या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली. तर INS वाचवण्याच्या मोहिमेत शिवसेनेचेही शिष्टमंडळ होते. तसेच ते पैसे ज्यांच्याकडे द्यायला हवे त्यांच्याकडे दिले आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. तर अर्ध्या पाऊण तासात किती पैसे जमा होऊ शकतात, असेही सोमय्या यांनी म्हटले. त्यावर संजय राऊत यांनी सोमय्या यांचे जुने ट्वीट शेअर करत सोमय्यांच्या दाव्यातील फोलपणा दाखवून दिला. त्यामुळे आता ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना समन्स पाठवल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


Updated : 9 April 2022 9:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top