जगावर आणखी एका युध्दाचे सावट? किम जोंग उनच्या बहिणीने दिली अण्वस्र हल्ल्याची धमकी
उत्तर कोरियाची भविष्यातील हुकूमशहा अशी ओळख सांगणाऱ्या किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला अणूहल्ल्याची धकमी दिली आहे.
X
गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. त्यामुळे संपुर्ण जगाचे टेन्शन वाढले असतानाच आता उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला अण्वस्र हल्ल्याची धमकी दिल्याने जगाच्या टेन्शमध्ये वाढ झाली आहे.
रशिया युक्रेन युध्दाचा फटका संपुर्ण जगाला बसला आहे. तर या युध्दामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. त्यामुळे हे युध्द संपावं यासाठी चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. मात्र त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे रशिया युक्रेन युध्द सुरूच आहे. त्यातच आता उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची बहिण किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाला अणूहल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
दक्षिण कोरियाने एका चर्चेदरम्यान आपल्या सैन्याच्या क्षमतेचा उल्लेख केला होता. तर दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे आमच्यातील संबंध आणखी बिगडले असून तणाव वाढला आहे, असे किम यो जोंग हिने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सूह वुक यांनी दक्षिण कोरियाकडे अनेक मिसाईल आहेत आणि ते उत्तर कोरियातील कोणत्याही ठिकाणी अचूक हल्ला करू शकतात, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याची बहिण किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाला अणू हल्ला करून संपून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युध्द सुरू असताना उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील वाढता तणाव यांमुळे जगावर आणखी एका युध्दाचे सावट निर्माण झाले आहे.