Home > Election 2020 > हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
X

नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यासाठी जय्यत तयारीला सुरूवातही झालीय. या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये हत्या झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना खास निमंत्रित कऱण्यात आलंय.

३१ मे रोजी मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७ हजार मान्यवरांना निमंत्रित कऱण्यात आलंय. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्षात मृत्यु झालाय अशा ५० पेक्षा जास्त कुटुंबानाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय.

पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकारिणीकडून या मृत झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शपथविधी सोहळ्याला आणलं जाणार आहे. हे कुटुंबिय २९ मे रोजी पश्चिम बंगालमधून प्रवासाला सुरूवात कऱणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालंय. त्यामुळं भाजपनं पश्चिम बंगालकडे अधिक लक्ष द्यायला सुरूवात केलीय. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका आहेत, त्या अनुषंगानं तृणमुल काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.

Updated : 29 May 2019 5:12 PM IST
Next Story
Share it
Top