'खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजप आणि मिंधे गटात आहेत' - राऊत
X
Mumbai - शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी आज खिचडी घोटाळ्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप आणि मिंधे गटावर गंभीर आरोप केले. खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजपात आणि मिंधे गटात असल्यांचं संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत म्हणाले, "खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजप आणि मिंधे गटात आहेत. भाजपने या घोटाळ्याचा वापर महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केला आहे. ईडीने आमच्यावर आरोप केले आहेत, पण त्यांचा कोणताही पुरावा नाही. ईडीचं काम आता २ ते ५ लाखाची चौकशी करणं झालं आहे. एवढी ईडीची पातळी घसरली आहे."
राऊत म्हणाले, "सोमय्याची आमच्यावर आरोप करण्याची लायकी नाही. त्यांच्याविरोधात पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत." त्यांनी ८ हजार कोटींच्या रुग्णवाहीका घोटाळ्यावर बोलावं, ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोलावं महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत. त्यावर किरीट सोमय्यांनी बोलावं असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
राऊत यांनी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. वंचित आघाडी ही आज बैठकीला उपस्थित राहणार आहे.आमच्यात कोणताही वाद नाही राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत