मोदींमुळे अरविंद केजरीवालांचं दुकान बंद - देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश विदेशातून समर्थन मिळत आहे. त्यामुळे इतर पक्षाची राजकीय दुकान बंद होत आहे. म्हणून हे आमच्या विरोधात एकत्र येत आहेत. मात्र यासर्व गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
X
आम आदमी पार्टीचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींन विरोधात उभे राहण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. उध्दव ठाकरे नंतर केजरीवाल यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. भेट घेऊन काही फायदा होणार नाही असंही फडणवीस म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी एकेकाळी शरद पावरांवर टीका केली होती. त्यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं. शरद पवार खूप बेईमान आहेत. त्याच्या स्विस बॅंक आकाऊंट मध्ये किती पैसे आहेत. हे आम्हाला माहीत आहे. खरं तर शरद पवारांना जेलमध्ये असायला हवं होत. मात्र ते एक नेते म्हणून काम करतात . असे वक्तव्य केजरीवाल वाल यांनी केलं होतं. याचाच संदर्भ देत फडणवीस यांनी उत्तर दिलें आहे. मोदींना देश -विदेशांतून समर्थन मिळत आहे. त्यामुळे ह्या सर्व पक्षांची राजकीय दुकान बंद झालं आहे. म्हणून हे सर्व एकत्र येत आहेत. मात्र याचा काहीच फायदा होणार नसल्याच फडणवीसांनी सांगितले आहे.