Home > News Update > कशाला हव्यात १७६० संघटना? केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप

कशाला हव्यात १७६० संघटना? केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप

कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते केदार शिंदे यांनी 'कशाला हव्यात १७६० संघटना?' म्हणत ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

कशाला हव्यात १७६० संघटना? केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप
X

पिंपरी चिंचवड: मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते (Raju Sapte) यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. राजू सापते यांच्या आत्महत्येने मराठी चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली.त्यानंतर राजू सापते (Art Director Raju Sapte) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. याचबाबत मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते केदार शिंदे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

सरकार म्हणून कलाकारांना सांभाळणं हे खुर्चीवर असलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य



केदार शिंदे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, "कशाला हव्यात १७६० संघटना? काय गरज राजकीय हस्तक्षेपाची? सरकार म्हणून कलाकारांना सांभाळणं हे खुर्चीवर असलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. #RajuSapte यांच्या मरणाची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्र राज्य मध्ये मराठी माणसांची गळचेपी कोण रोखणार?" असा आशयाचे ट्विट केदार शिंदे यांनी केले आहे.राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींमध्ये उत्तरभारतीय व्यक्तींचा समावेश असल्याने केदार शिंदे यांनी मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. सोबतच विविध संघटनांचा खरपूस समाचार घेतला आहे. सरकारने देखील कलाकारांना सांभाळायला हवे ते त्यांचे कर्तव्यच असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान वाकड पोलिसांनी आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. चंदन ठाकरे असे वाकड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू सापते यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध करत राजू सापतेंनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता.

लेबर युनियनचे राकेश मौर्य, मिस्त्री नरेश विश्वकर्मा, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे यांचा शोध सुरु आहे.दरम्यान राजेश सापते यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Updated : 5 July 2021 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top