Home > News Update > कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध
X

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप यांनी इतिहास घडवताना कारखान्याची निवडणूक बिनविरोध जिंकली आहे. माजी आमदार जगताप यांच्या गटाने २१ पैकी २१ जागा बिनविरोध जिंकत आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुकीसाठी १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत विरोधी गटाचे दत्तात्रय पानसरे यांच्यासह २८ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. याच ठिकाणी विरोधी गटाचे कंबरडे मोडले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा काल शेवटचा दिवस होता.

राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांच्या मदतीने आपल्या गटातील इच्छुकांचे उमेदवारी अगोदरच काढून घेतले. हिंगणी गटातून निवृत्ती वाखारे, विजय शिर्के, सुभाष राक्षे राजापुर गटातून विवेकपवार, संभाजी देवीकर, अशोक वाखारे. एरंडोली गटातून मोहनराव आढाव, मनोहर शिंदे, कचरु मोरे. पिंपळगाव पिसा गटातून -राहुल जगताप, प्रमोद इथापे. कोळगाव गटातून जालिंदर निंभोरे, मच्छिद्र नलगे. भानगाव गटातून अशोक शितोळे, बाळासाहेब उगले बिनविरोध निवडून आले.

तर सोसायटी मतदारसंघ- डॉ. प्रणोती राहुल जगताप, अनुजाती प्रवर्ग - आबासाहेब शिंदे, महिला प्रवर्ग- अनिता सुभाष लगड व विमल अशोक मांडगे, ओबीसी प्रवर्ग- मोहनराव कुंदाडे, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग- संपत कोळपे निवडून आले.

Updated : 4 Jan 2022 7:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top