कंगना राणौत पुन्हा बरळली
X
सतत वादग्रस्त भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीच्या बाजूने टीव-टीव करणाऱ्या कंगना राणौत पुन्हा एकदा बरळली असून यावेळी तिने पुन्हा एकदा दिल्लीच्या सिंधू बॉर्डर वरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना टार्गेट केले आहे.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे शीतयुद्ध आता पराकोटीचं पेटलं आहे.शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय असा दावा कंगनाने केला आहे. तिने या ट्विटद्वारे दिलजीतवर देखील निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. परिणामी लहान उद्योग आणि कारखान्यांमध्ये आर्थिक मंदी आली आहे. कदाचित या आंदोलनामुळे दंगल देखील होऊ शकते. प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांनी सांगावं या आर्थिक मंदीला जबाबदार कोण? अशा आशयाचं ट्विट करुन तिने शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. तिनं या ट्विटसोबत टाईम्स नाऊचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.