Home > News Update > कल्याण डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर, भूमाफियांचे धाबे दणाणले

कल्याण डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर, भूमाफियांचे धाबे दणाणले

कल्याण डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर, भूमाफियांचे धाबे दणाणले
X

कल्याण डोंबिवली मधील अनाधिकृत बांधकामावर कल्याण डोंबिवली महापालिकेने कारवाई केली आहे.बेकायदा बांधकामावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेने कठोर पाऊले उचलली आहे .या बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहिम रावबून गेल्या चार महिन्यात सात ते आठ मजली बेकायदा 70 इमारती ,चाळीतील 300 खोल्या ,प्लिंथ लेव्हलला असलेली 150 बांधकामे,त्याचबरोबर ४ हजार बेकायदा टपऱ्या व अतिक्रमण अशा एकून चार हजार 150 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

तसेच बेकायदा बांधकाम करणाऱ्या ७० जणांविरोधात एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत .महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत .ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून इथून पूढे अनधिकृत बांधकामांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे .

हि कारवाई सातत्याने सुरु राहील. असा इशारा पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिला आहे. घर अनाधिकृत आहे की नाही, हे पाहण्यासाठी नागरिकांना हेल्पलाइन नं दिला आहे.कमी पैशात घर मिळत आहे म्हणून नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडु नये.अशी सुचना नागरिकांना सुर्यवंशी यांनी दिली आहे.

Updated : 30 April 2022 5:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top