Home > News Update > लोकलबंदचा जीवघेणा फटका

लोकलबंदचा जीवघेणा फटका

लोकल सेवा बंद असल्यामुळे कॅन्सर,हृदयरोग,किडनी,या सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांची आज खूप वाईट अवस्था आहे.कारण ज्यांचे मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना उपचारासाठी जाता येत नाही त्यामुळे हृदयरोग असलेल्या एका पत्रकारावर अक्षरशः घरात तडफडून मारण्याची पाळी आली आहे.. त्याने आपल्या वेदना कशा प्रकारे कथन केल्या ऐका सोनु जाधवच्या शब्दात.....

लोकलबंदचा जीवघेणा फटका
X

कोरोनामुळे हजारो लोकांचे जीव गेले. मुंबईची प्राणवाहीनी असलेली लोकलसेवा नऊ महीन्यापासून बंद आहे. पत्रकार सोनु जाधव यांना १५ जून २०१५ रोजी पहिला हार्ट हटॅक त्यानंतर तत्काळ के.ई.एम. रुग्णालयात नेले.

सुरवातीला एंजिओग्राफीनं हृदयात दोन ब्लोकेज सापडले. त्यामुळे जो मेजर म्हणजे ९६ टक्के होता त्यावर तातडीने एंजिओप्लास्ट्री करण्यात आली त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये दुसऱ्या ब्लोकेजवर सायन रुग्णालयात एंजिओप्लास्ट्री करण्यात आली. तत्पूर्वी तिथेही एंजिओग्राफी करण्यात आली तेंव्हापासून के.ई.एम मध्ये उपचार सुरू आहेत महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा हृदय रोगाशी संबंधित चाचण्या करण्यासाठी के.इ.एम मध्ये जावे लागते.

शिवाय तिथे औषध गोळ्याही मोफत मिळतात. दरम्यान २०१७ मध्ये मला दुसरा हार्ट अॅटेक आला तेंव्हा के इ एम मध्ये ८ दिवस अॅडमिट होते. त्यानंतर औषध उपचाराने बरे वाटले मात्र चेक अपसाठी ओपीडी मध्ये महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा जावे लागते. पण लॉक डाऊन मध्ये सार्वजनिक परिवहन सेवा बंद झाल्याने विरार वरून केइएम मध्ये साडेचार महिने जाता आले नाही. इथल्या खाजगी रुग्णालयांची अव्वाच्या सव्वा फी परवडत नाही. त्यात चार महिने पगार नाही.

रोज छातीत दुखते पण sorobitet ची गोळी जिभेखली ठेवून तात्पुरता आराम करतो. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. या संकटाच्या काळात काही राजकीय पुढाऱ्यांनी संपर्क केला पण कुणीही मदत केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याय पत्र लिहलय. बघुया त्यांना जर यात तथ्य आढळले व माझ्यावर किंवा माझ्यासारख्या इतर गंभीर आजारांच्या पेशंटवर अन्याय होतोय असे त्यांना वाटले तर ते सूमोटो याचिका दाखल करून घेतली कारण हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. सरकारच्या चुकीच्या धोरण विरूद्ध गंभीर आजारी रुग्णांच्या या वेदना आहेत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने या सेवेतील लोकांना लोकलने प्रवासाची सुविधा सरकारने दिलीय.

मग ही वैद्यकीय सेवा ज्या रुग्णांसाठी आहे त्यांना लोकल प्रवास का नाकारला जातोय? आम्ही असे म्हणत नाही की सरसकट सगळ्यांनाच रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा द्या केवळ जे गंभीर आजारी आहेत म्हणजे हार्ट,किडनी, पॅरेलिसीस,कॅन्सर,किंवा ब्रेनच्या व्याधी यासारख्या रुग्णांना तरी लोकल प्रवासाची मुभा द्या एवढंच आमचं म्हणणं आहे, अशी कैफीयत सोनु जाधव यांनी मॅक्स महाराष्ट्राकडं मांडलीय...

Updated : 27 Dec 2020 4:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top