Home > News Update > मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या जितेंद्र शिंदे यांना वार्षिक दीड कोटी पगार?

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या जितेंद्र शिंदे यांना वार्षिक दीड कोटी पगार?

बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी पगार सुरू असताना देखील त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने पैसे घेतल्याची चर्चा.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या जितेंद्र शिंदे यांना वार्षिक दीड कोटी पगार?
X

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जगभरात लाखो चाहते असणारे . अमिताभ जिथे जातील तिथे लोकांची गर्दी होते. यासाठी त्यांना सुरक्षिततेची गरज आहे. त्यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्यावर आहे. जितेंद्र शिंदे हे कालपासून चर्चेचा विषय बनले आहेत त्याच कारण म्हणजे जितेंद्र यांचा वार्षिक पगार.

जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी रुपये असल्याचे माहिती समोर आली आहे, त्यानंतर गुरुवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात केली.

जितेंद्र यांना सरकारी पगार मिळत असताना अशा पद्धतीने वेगळे पैसे घेण्याची त्यांना परवानगी नसताना त्यांनी पैसे घेतल्याचे समोर आले आहे. हे राज्य सेवा नियमांच्या हे विरोधात आहे. मात्र जितेंद्र यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती का? आणि ते दुसऱ्या व्यक्तीकडून पगार घेत होते का? याबाबत चर्चेला उधाण आलं असू याबाबत आता राज्य सरकार चौकशी करत आहेत.

Updated : 27 Aug 2021 11:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top