'आरक्षणाच्या लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते..', जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानं नवा वाद
ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
X
ठाणे // राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे. मंत्री आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत बोलत असताना ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानं विरोधक आता आक्रमक झालेत.
खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊन देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मंत्री आव्हाड यांच्या वक्तव्यावर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावळकुठे आक्रमक झालेत. जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या विधानांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. महराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे तो अतिशय निंदनीय आहे. ओबीसी समाज त्यांना कधी माफ करणार नाही. असं बावनकुळे यांनी म्हटले आहे. सोबतच आव्हाड यांनी तमाम ओबीसी बांधवांची माफी मागावी असही त्यांनी म्हटले आहे.