मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या झोपडपट्ट्यांसाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
X
विधीमंडळ अर्थसंकल्पिय आधिवेशन मुंबईत सुरु आहे.विधीमंडळात अनेक प्रश्नांवर चर्चा.प्रतिचर्चा होत असतात.त्यावर आता पुर्नवसन रखडलेल्या ५२३ झोपडपट्टयांवर सरकारन येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे.अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.
मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी ॲमिनिटी स्कीम सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली आहे. येत्या दोन दिवसात या बाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील अशा रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली. जितेंद्र आव्हाड यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर उत्तर देताना ही घोषणा केली. या रहिवाशांना ॲमिनिटी स्कीम तयार करण्यात आल्याचे सांगत या योजनेचा फायदा 523 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना होईल, असे आव्हाड यांनी सांगितले. ही फाईल गृहनिर्माण विभागाकडून मुख्य सचिवांकडे आणि तिथून मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजूरीसाठी गेली आहे. येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या 40% हुन अधिक योजना अशाच रखडल्या आहेत. यातील बिल्डर ईडी, पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या विविध चौकशांमध्ये अडकले आहेत. काहीजण कारागृहात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांची ससेहोलपट सुरु आहे. मूळ घर तोडले गेले, बिल्डरकडून दोन वर्षांनंतर पुढचे भाडे मिळणे बंद झाले, त्यामुळे त्यांना आता कोणी वाली उरलेला नाही. अशावेळी सरकारने याबाबत काहीतरी योजना तयार करुन अशा झोपडपट्टीधारकांना भाडे कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच पुनर्वसनाचे घर त्यांना मिळावे यासाठी सरकार काय प्रयत्न करणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.