Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ
X
कळवा येथ पुलाच्या उदघाटन साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एकत्र आले होते या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडी जवळून आव्हाड जात असतांना एक महिला कार्यकर्तीही समोर आल्याने आव्हाड यांनी महिलेला हात लावून ढकलून दिल अस व्हिडिओत दृश्य दिसत आहे आणि यावरूनच महिलेले जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध पोलिसात विनयभंग चा गुन्हा दाखल केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना तक्रार दार महिलेले जितेंद्र आव्हाड हे आपल्या समोर आले आणि त्यांनी मला हात लावून ढकलून दिलं , कोणत्याही महिलेच्या परवानगी शिवाय हात न लावता येत नाही आव्हाड यांनी आपला विनयभंग केला आहे . मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ह्या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान ह्या प्रकरणात जोरदार राजकारण रंगल असून आरोप प्रत्यारोपांचा फैरी राजकीय वर्तुळात सुरू आहेत.