मी धर्माधिमानी हिंदू, वेदोक्त प्रकरणावरून रंगलेल्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी
X
नाशिकमधील काळाराम मंदिरात संयोगिताराजे या पुजा करत असताना महंतांनी वेदोक्त मंत्राचा उल्लेख करण्यास नकार दिला. त्यावरून राज्यात नवा वाद सुरु झाला आहे. या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.
नाशिकच्या (Nashik Kalaram Temple) काळाराम मंदिरात संयोगिताराजे छत्रपती (Sanyogitaraje Chhatrapati) या पुजा करत होत्या. यावेळी महंताने पारंपरिक पध्दतीने पुजा सुरु केली. मात्र ही पूजा वेदोक्त (Vedokta) पध्दतीने करण्याची मागणी संयोगिताराजे यांनी केली. मात्र महंताने नकार दिला. त्यामुळे घडलेला प्रसंग संयोगिताराजे यांनी इन्स्टाग्रामवर (Sanyogitaraje Instagram) पोस्ट केला. त्यानंतर राज्यात नवा वाद सुरु झाला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Tweet) म्हणाले, मी धर्माभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुंबकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र (Shudra) आहे आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही, असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी (Puronokta- Vedokta) महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे, त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना (Lord Buddha) त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना (Bhagvan Mahaveer) त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर (Sant Basaveshwar) अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना (Chakradhar Swami) त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या (Dnyaneshwar Mauli) आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख (Sikh relegion) धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना (Sant Tukaram Maharaj) त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला (Aurangjeb Badshah) मदत केली व संभाजी राजेंचा (Sambhaji Raje) घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.
महात्मा फुलेंनी (Mahatma Phule) या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलच पाहिजे, ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.
पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar). ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली (Manusmruti). ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे, असे म्हणत संविधान लिहीले आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोक वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही, असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे.
या देशाच्या घटनेत, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00 वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे… pic.twitter.com/tb3za6g7LU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023