Home > News Update > West Bengal politics : काँग्रेसचे एकमेव आमदार तृणमुलमध्ये

West Bengal politics : काँग्रेसचे एकमेव आमदार तृणमुलमध्ये

West Bengal politics :  काँग्रेसचे एकमेव आमदार तृणमुलमध्ये
X

पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे एकमेव आमदार बायरान बिस्वास (Bayron Biswas) आता टिएमसी (TMC) पक्षात दाखल झाले आहेत. २९ मे रोजी तृणमुल काँग्रसमध्ये (Trinamool Congress) दाखल झाले. काँग्रेस पक्षाचे (Congress) नेते जयराम रमेश (jayram ramesh) यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. रमेश म्हणालेत सागरदिघी जनतेसोबत धोका झाला आहे. अशा कृतीमुळे भाजपचे उद्दिष्ट साध्य होत असल्याची खंत जयराम रमेश यांनी बिस्वास यांच्या टीएमसी प्रवेशानंतर व्यक्त केली.

जयराम रमेश आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "ऐतिहासिक विजयात काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तीन महिन्यातच बायरन बिस्वास यांना आमिष दाखवण्यात आले. सागरदिघी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या जनादेशाचा हा विश्वासघात आहे. याआधी गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये अशा प्रकारे आमदार फोडाफोडी करण्यात आली होती. अशा घटनांमुळे विरोधकांची एकता खंडित होणार नाही. मात्र, अशा घटनांमुळे भाजपची उद्दिष्ट साध्य होत असल्याची खंत जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

Updated : 30 May 2023 4:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top