कंगना रानौत पुन्हा गोत्यात: आता जूहू पोलिस चौकशी करणार
वादग्रस्त वक्तव्यं करुन अडचणीत येणारी अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. आधीच मानहानीचे खटले कमी होते की काय, म्हणून आता गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दाव्याची चौकशी करण्याचे आदेश कोर्टानं जुहु पोलिसांना दिले आहेत.
X
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिट्स मिळाल्या आहेत.
मात्र, "या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली आहे. आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसान केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी कोर्टाकडे केली आहे.
प्रिन्सेस डायनाची कथा 2022 मध्ये रुपेरी पडद्यावर येणार
कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप सोशल मीडियावर आणि रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा यामध्ये थेट उल्लेख केलेला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो हिट्स मिळाले आहेत.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी आपला आवाज खूप जास्त चढवला होता, इतका की आपला थरकाप उडाला असा दावा कंगनानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कंगनाची बहिणी रंगोली हिनंही या घटनेची पुष्टी करत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होतेय, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी याचिका दाखल केली होती. कोर्टानं १६ जानेवारी २०२० पर्यंत पोलिस चौकशीचा अहवाला कोर्टाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.