Home > News Update > जरांगे पाटील पुन्हा एकदा फडणवीसांवर बरसले; पोलिसांचे कान फुकायचे बंद करा...!

जरांगे पाटील पुन्हा एकदा फडणवीसांवर बरसले; पोलिसांचे कान फुकायचे बंद करा...!

जरांगे पाटील पुन्हा एकदा फडणवीसांवर बरसले; पोलिसांचे कान फुकायचे बंद करा...!
X

आमचे बॅनर, पोस्टर काढण्याच्या सूचना देत आहेत पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे, आमच्या घराला पोम्प्लेट चिटकवायचे आहे आता ते आम्ही सहन करणार नाही असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.


Maratha Reservation News Update : जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता ते पुन्हा एकदा दौऱ्यासाठी बाहेर पडले असून यातील पहिलीच बैठक बीड मधील वाणगाव फाटा येथे झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ते आता पोलिसांचे कान फुकत आहेत. आमचे बॅनर, पोस्टर काढण्याच्या सूचना देत आहेत पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे, आमच्या घराला पोम्प्लेट चिटकवायचे आहे आता ते आम्ही सहन करणार नाही.

आता यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशी मोहीमच आम्ही राज्यभर चालवणार आहोत. अगदी गाड्यावर देखील हेच घोषवाक्य लिहिले जाणार आहे. माझ्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा आरोप करतात आणि दुसरीकडे तेच शरद पवार यांना सराटे अंतरवालीतून रस्ता बदलून जावे लागले असे सांगतात. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनातच द्वेष आहे, तो द्वेष आता सर्व समाजाने पाहिला आहे. मी समाजाशी प्रामाणिक आहे, परंतु माझ्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत.

माझी एकच मागणी आहे मराठा समाजाला ओबिसितून आधीसूचनेनुसार आरक्षण द्या, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलन उभारू. बीडमध्ये मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलाय परंतु त्याच्यावर मी काही बोलणार नाही तो निर्णय समाजाने घेतला आहे असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Updated : 3 March 2024 3:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top