जेम्स लेन ने बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तकाच्या शेवटी कशासाठी आभार मानले? पुरुषोत्तम खेडेकर यांचा सवाल
James lane Controversy: बाबासाहेबांशी कधीही एका शब्दाने बोललो नाही, म्हणणाऱ्या जेम्स लेनला पुरुषोत्तम खेडेकर यांचा सवाल पुस्तकाच्या शेवटी कशासाठी आभार मानले?
X
जेम्स लेनच्या 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकासाठी लेन ला बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याचा आरोप पुरंदरे यांच्यावर केला जातो. यावर लेखक जेम्स लेननं India Today ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यांनी 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक लिहिताना मला बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणतीही मदत न केल्याचा दावा केला आहे. पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते. 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नसल्याचा दावा जेम्स लेननं केला आहे.
यावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पुस्तकाच्या शेवटी बाबासाहेब पुरंदरे यांचे लेन्स ने कशासाठी आभार मानले आहेत. असा सवाल केला आहे? पाहा काय म्हणाले पुरुषोत्तम खेडेकर?