जैश ए मोहम्मदकडून नागपूरात रेकी, बंदोबस्त वाढवला…
X
जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेकडून नागपुरातील RSS मुख्यालय सह महत्वाच्या ठिकाणांची पाहणी केल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त RSS च्या मुख्य द्वारासमोर लावण्यात आला आहे. नागपूर पोलीसांतर्फे सुरक्षा व्यवस्था चोख उभारण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
नागपुरातील महत्वाच्या ठिकाणांची जैश ए मोहम्मद च्या स्लीपर सेल च्या आतांकवाद्यांनी केल्याचे सांगण्यात येत असून या ठिकाणांची माहिती पोलिसांकडून जाहीरपणे सांगण्यात आली नाही. मात्र, नागपूर पोलीस कोणत्याही परिस्थितीत सज्ज असून यासंदर्भातील तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
सध्या rss मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सिमेंट चे सुरक्षा कठडे क्रेनद्वारे उभारण्यात आले आहे. या घडामोडीत नागपुरातील महत्वाच्या ठिकानांचा चित्रीकरनावर पोलिसांनी पुर्णतः बंदी घालण्यात आली असून नागपुरातील माध्यमांना तशा सूचनाही whats आप च्या माध्यमातून देण्यात आल्या आहे.