Home > News Update > जयराम पवारांच्या मलुकीला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर

जयराम पवारांच्या मलुकीला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर

जयराम पवारांच्या मलुकीला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर
X

महाराष्ट्र शासनानाच्या माध्यमातून दिला जाणारा राज्य हिंदी साहित्य अकादमीचा शशीभूषण वाजपेयी हिंदी लेखक पुरस्कार जयराम पवार लिखित मलुकी या शौर्यगंथाला मिळाला आहे. हिंदी क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणा-या साहित्यिकांना दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.








जयराम पवार यांना रक्कम ३५,००० रुपये देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. पवार यांनी यापूर्वीही लोहगढ: जगातील सर्वात मोठा किल्ला या ऐतिहासिक पुस्तकाची रचना केली आहे. याशिवाय चालू वर्षी त्यांचे राजा भोज परमारोकी गोर वंशीय विरासत या ग्रंथाचे विमोचन झालेले आहे तसेच गुरु ग्रंथ मध्ये बंजारा यांचे महत्त्व दर्शवणारा एक ग्रंथ हरियाणा साहित्य अकादमी कडून व सोळाव्या सतराव्या शतकात बंजारा यांनी दिलेले दिलेली शहीदी यावर सुद्धा त्यांचे ग्रंथ प्रकाशन झालेले आहे. मलुकी या पुस्तकाला हिंदी भाषा हिंदी भाषेच्या प्रचार - प्रसारासाठी आणि राष्ट्रभक्तीवर आधारित साहित्य निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Updated : 11 March 2023 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top