Home > News Update > चेतन सिंह सहानुभूती का पात्र है - चेतन सिंह च्या वकिलाचा दावा

चेतन सिंह सहानुभूती का पात्र है - चेतन सिंह च्या वकिलाचा दावा

चेतन सिंह सहानुभूती का पात्र है - चेतन सिंह च्या वकिलाचा दावा
X

मुंबई- जयपुर एक्सप्रेसमध्ये RFP जवान चेतन याने गोळीबार केला. या गोळीबारात ४ जणाची हत्या झाली. RFP कर्मचारी ASI टीकाराम यांच्यासह ३ मुस्लिम प्रवाशांवर गोळीबार केला होता. दरम्यान् मुंबई सेंट्रल येथे आरोपी चेतन ला अटक करण्यात आली. त्याला बोरिवली न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने चेतनला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे. यावर आरोपी चेतनचे वकील अमित मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अँड. अमित मिश्रा म्हणाले की, "चेतनला पहिल्यांदाच कोर्टासमोर हजार केलं होतं. या प्रकऱणात तपास अधिकारी, सरकारी वकील यांनी जवाब दिला. त्यात आरोपीची मनस्थिती ठीक नव्हती. मानसिक स्वास्थ ठीक नव्हते. या आधारावर आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर बचाव पक्षानं ७ ऑगस्टपर्यंत कोठडीची मागणी केली, ही मागणी मान्य करण्यात आली.

याप्रकरणाला धार्मिक संदर्भ देण्यात येत असल्याबद्दल मिश्रा यांना विचारणा करण्यात आली. त्यावर मिश्रा म्हणाले की, याबाबत मी टिप्पणी करणार नाही. मी फक्त एफआयआर मध्ये जे आहे त्यावरच बोलेल. यासंदर्भात न्यायालयात कुठलंही वक्तव्यं करण्यात आलं नाही. या प्रकरणाला धार्मिक कऱण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, चेतननं बडोदा इथं असतांना आपल्या वरिष्ठांना सांगितलं होतं की, त्याची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळं तो सुट्टी घेणार आहे. बडोदा रेल्वे स्टेशनवर आराम करणार असल्याचंही त्यानं वरिष्ठांना कळवल्याचं अँड. मिश्रा यांनी सांगितलं.

Updated : 2 Aug 2023 5:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top