Home > News Update > सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नव्हते : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावनीक उद्गार

सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नव्हते : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावनीक उद्गार

भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात काल दहा नवजात बालक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी हात जोडून उभं राहण्याखेरीज सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत अशी भावना व्यक्त केली. व जे काही सत्य आहे ते बाहेर येईल व दोषींवर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नव्हते : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावनीक उद्गार
X

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर सात जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले. या घटनेमुळं राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत चौकशीची आदेश दिले आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहाणी केली तसेच नवजात बालक गमावलेल्या पालकांचे सांत्वन केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील खरं काय ते शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की रुग्णालयाने अहवाल येऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे ही तपासलं जाईल. कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे का? याच्या चौकशीचे आदेश देखील दिले असल्याचं ते म्हणाले.

तसेच या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विभागीय आयुक्त तसेच मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे यांची नियुक्ती केली असून एक टीम तयार केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल व दोषींवर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम देखील उपस्थित होते.


Updated : 10 Jan 2021 4:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top