Home > News Update > #restore_maxmaharashtra : स्वतंत्र पत्रकारितेचे पाठीराखेही सरकारच्या रडारवर

#restore_maxmaharashtra : स्वतंत्र पत्रकारितेचे पाठीराखेही सरकारच्या रडारवर

#restore_maxmaharashtra : स्वतंत्र पत्रकारितेचे पाठीराखेही सरकारच्या रडारवर
X

देशातील अनेक माध्यमं सरकारी यंत्रणांपुढे नांग्या टाकत असताना सातत्याने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या मॅक्समहाराष्ट्रचं युट्यूब चॅनल युट्यूबने बंद केलं आहे. दलित मुलांना मारहाण करणारा व्हिडीओ टाकल्यानं युट्यूबने ही कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे हा व्हिडीओ दोन-तीन वर्षापुर्वी जुना आहे. एकीकडे मॅक्समहाराष्ट्रचं युट्यूब चॅनल बंद होत होतं. त्याच वेळी खोट्या बातम्यांचा पर्दापाश करणाऱ्या अल्ट न्यूज, द वायर, द प्रिन्ट, मॅक्समहाराष्ट्र, द केन, लाइव्ह लॉ या सारख्या स्वतंत्र माध्यमांना आर्थिक मदत करणाऱ्या IPSMF या संस्थेवर आयटीचा छापा पडला. मॅक्समहाराष्ट्रचं युट्यूब चॅनल बंद होणं आणि IPSMF या संस्थेवर छापा पडणं या दोनही घटना एकमेंकांशी जोडल्या गेलेल्या आहेत.

एनडीटीव्ही साऱख्या चॅनलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असताना 2024 पुर्वी समाजमान्यता असलेल्या इतर माध्यमांवर देखील वेगवेगळ्या माध्यमातून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेव्हा सर्व माध्यमं सरकारसमोर नांग्या टाकत होती. तेव्हा अल्ट न्यूज, द वायर, द प्रिन्ट, मॅक्समहाराष्ट्र, द केन, लाइव्ह लॉ यासारखी माध्यमं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका निभावत होती. देशभरातील माध्यमांवर मोठा दबाव असताना ही माध्यमं सरकारला आरसा दाखवण्याचं काम करत होती.

Updated : 8 Sept 2022 8:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top