रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साजरा
X
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला इतिहासात फार महत्व आहे. यंदाही मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर २०२१ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा ३४८ वा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला गेला. कोविड १९ व प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन हा उत्सव साजरा करण्यात आला.
६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. त्यानंतर काही काळातच २४ सप्टेंबर १६७४ रोजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. पहिल्या राज्याभिषेक सोहळ्या इतकेच दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्यालाही महत्व आहे. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेऊन त्या इतिहासाचा जागर करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
संभाजी ब्रिगेड गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक कोणत्या पद्धतीने झाला यावरुन सुरु असणाऱ्या वादात न पडता या ऐतिहासिक दिवसाचे महत्व टिकून राहिले पाहिजे यासाठी दरवर्षी साक्त पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडतो.