Home > News Update > मोदी सरकार उद्योगपतींच्या हातची कठपुतली आहे का?

मोदी सरकार उद्योगपतींच्या हातची कठपुतली आहे का?

मोदी सरकार अदानी अंबानीसाठी काम करत असल्याची भावना शेतक-यांमध्ये का वाढत आहे?

मोदी सरकार उद्योगपतींच्या हातची कठपुतली आहे का?
X

सध्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केली जात आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यांत नवीन शेतकरी सुधारणा कायद्याविरोधात मोठा आक्रोश आहे.

या संदर्भात हरियाणातील नाथुरामपुर दावच्या महिला संघटक सुशीला जांगडा यांच्याशी बातचीत केली.

या कायद्यानंतर सरकार विरोधात मोठा आक्रोश वाढला असल्याचं सुशिलाजी सांगतात...

सुशीला म्हणतात की, मोदी सरकारने योजना अनेक आणल्या. परंतु त्या योजना नावालाच राहिल्या आहेत. मी भाजप महिला संघटनेचं गेल्या १० वर्षापासून काम करत आहे. परंतु मला कुठेही अच्छे दिन आलेले दिसले नाही. मी स्वत: पक्षाचं काम ग्राऊंड स्तरावर जाऊन करत असताना अनेक समस्या पाहते. परंतु माझ्याकडून जितकं शक्य होईल तितकं मी काम करते. काही प्रश्नांसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी लागते. परंतु हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.

भाजपचं सरकार केंद्र आणि राज्यांत जरी असले तरी विकासाच्या मोठ-मोठ्या गप्पा करताना गावपातळीवर भाजपचं काम शून्य आहे. ग्रामीण भागातील लोकांना रेशन कार्ड अद्यापही मिळाले नाही.

मोदीजी अंबानी-अदानी यांच्या हातातली कटपुतली आहे. बेरोजगारी, महिला सुरक्षा इ. गोष्टींचा हरियाणा नाही तर देशभरात बोजवारा सुरु आहे. भाजपचं काम करण्याची इच्छा नसल्याचं मत सुशीला यांनी व्यक्त केलं आहे.


Updated : 12 Dec 2020 6:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top