कोविड मृत्यूंचे तांडव सुरू असताना हा कसला 'आयपीएल' खेळ?
जगात सर्वाधिक कोरोना संसर्ग झालेल्या भारतामध्ये अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरू असताना आयपीएल क्रिकेटच्या मॅच सुरू असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरून खरपूस टीका होत आहे. आता एका इंग्रजी वृत्तपत्राने अखेर आयपीएल चे वृत्तांकनावर बहिष्कार टाकून संवेदना बोथट नसल्याचे दाखवून दिले आहे.
X
भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाने देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने
न्यु इंडियन एक्सप्रेसचे आयपीएल कव्हरेज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवन आणि मृत्यूच्या मुद्द्यांकडे देशाचे लक्ष केंद्रित ठेवण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न असल्याचे वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
देशभरातून भारताला मदतीचा ओघ सुरू झाला असून देशाच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खरपूस टीका केली आहे.
पाकिस्तानने देखील भारताला मदत देऊ केली असून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (शोएब अख्तर) आपल्या यूट्यूब चैनलवर आयपीएल बंद करण्याची मागणी केली आहे.
अख्तर ने सांगितले की कोरोना महामारी व्हायरस एक नवीन वैरियंट आला आहे. भारत कोरोना सुनामीच्या उंबरठ्यावर असून पाकिस्तानने आपल्या संपूर्ण देशातील लॉकडाउन करावे. जे पाकीस्तानी लोक कोरोना नियंत्रणाच्या एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसर) पालन करणार नाही त्यांच्यावर लष्कराने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आयपीएलच्या वेळापत्रकानुसार २०२१ चे आयपीएल सामने सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे आयोजकांनी रविवारी सांगितले.
मोठ्या कोरोना उद्रेकातही सर्व स्तरातून टीका होत असताना आयपीएल सुरू होऊन ठेवण्यामागे मोठे अर्थकारण कार्यरत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द केले तर अंदाजे चार हजार कोटींचे नुकसान होईल असे त्या तज्ञांचे म्हणणे आहे.सहा एप्रिल पासून सुरू झालेला आयपीएलचा कार्यक्रम हा 30 मे पर्यंत सुरू राहणार आहे. आयोजक अद्यापही आयोजनावर ठाम असून 30 मे पर्यंत हा आयपीएलचा खेळ सुरू राहणार का याबद्दल जनमानसामध्ये शंका निर्माण झाले आहेत.
आयपीएल चे खेळाडू पॉझिटिव आलेल्यांमध्ये नितीश राणा, देवदत्त परिक्कल, किरण मोरे डॅनियल सायन्स, अक्सर पटेल यांचा समावेश आहे. वाढत्या कोविड संसर्गामुळे अनेक खेळाडूंनी या आयपीएल खेळापासून अंग देखील काढून घेतले आहे. कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या वाढत असताना सरकारी व्यवस्था हतबल आहे. अशा भयंकर संकटाचे आयपीएलचा खेळाचा हट्ट का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.