बहुमताची खात्री करुन सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यायला हवं..
X
सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. शेवटी सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आंमत्रीत केले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी भाजपकडे बहुमत स्पष्ट आहे किंवा की, नाही याचा खात्री करुन राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रीत करायला हवं होतं.
राज्यात घोडेबाजार सुरु होऊ नये म्हणुन राज्यपालांनी लक्ष दिले पाहीजे. ज्यावेळेस भाजपाला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यावळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत १२ नोव्हेबरला सकाळी १२ वाजता आयोजीत केले आहे. बैठकीला शरद पवार सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहीती यावेळी असं मत मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केलं