Home > News Update > राज्यात 5051 कोटींची गुंतवणूक ; तब्बल 9 हजार जणांना मिळणार नोकऱ्या!

राज्यात 5051 कोटींची गुंतवणूक ; तब्बल 9 हजार जणांना मिळणार नोकऱ्या!

राज्यात 5051 कोटींची गुंतवणूक ; तब्बल 9 हजार जणांना मिळणार नोकऱ्या!
X

मुंबई //महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करताना ठाकरे सरकारला चांगलीच कसरत करावी लागली. मात्र, आता कोरोनाची लाट काहीशी ओसरल्याने राज्य सरकार पुन्हा कामाला लागले आहे. राज्यात तब्बल 5051 कोटी गुंतवणूक करार करण्यात आले आहे. या करारांमुळे 9 हजार जणांना नोकरीची नवी संधी मिळणार आहे.

दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा काम सुरूच ठेवलं आहे. दरम्यान काल विविध 11 कंपन्यांसोबत सुमारे 5051 हजार कोटींचा सामंजस्य करार राज्य सरकार सोबत केला अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत एकूण 1.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 3 लाख 34 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरले आहे. आज झालेल्या 12 सामंजस्य करारातून राज्यात 9000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील', असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

'गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने विशेष प्रयत्न केले आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे काल झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश अग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

Updated : 8 Dec 2021 8:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top